४३२. स्वातंत्र्य ज्योत
कसली लागली असती आस
कशाची धरली असती कास
शिवरायांशिवाय उरला असता
नुसताच गुलामीचा इतिहास
नाव पडताच कानी फक्त
स्वाभिमानच जागतो छातीत
एक होतो सगळा मराठा
जरी विभागला जाती पातीत
भाग्य आमचे थोर असे की
जन्मलो आम्ही ह्याच मातीत
स्वातंत्राचीच ज्योत तेवतेय
इथल्या दिव्यांच्या वाती वातीत
--- लबाड बोका
कसली लागली असती आस
कशाची धरली असती कास
शिवरायांशिवाय उरला असता
नुसताच गुलामीचा इतिहास
नाव पडताच कानी फक्त
स्वाभिमानच जागतो छातीत
एक होतो सगळा मराठा
जरी विभागला जाती पातीत
भाग्य आमचे थोर असे की
जन्मलो आम्ही ह्याच मातीत
स्वातंत्राचीच ज्योत तेवतेय
इथल्या दिव्यांच्या वाती वातीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा