४३४. प्रोत्साहन
टाकूया म्हणतेस पाऊल पुढे
पण जातेस मागे
ओढत असतात परत तुला
काही अदृश्य धागे
एकवट बळ सगळं आणि
तोडून टाक बंध
एक ठेव लक्षात नेहमीच
प्रेम असतंच अंध
हवी असेल तुला जर
जन्मभराची साथ
करू नकोस जास्त विचार
दे हातात हात
--- लबाड बोका
कवितेमागची भूमिका -
मुलगी प्रेमात पडलीय. मुलगा चांगला आहे पण काही कारणांमुळे मुलीच्या घरच्यांचा विरोध आहे. मुलगी निराशेच्या भरात आयुष्य संपवण्याचा विचार करतेय. तिने असं हकनाक मरण्यापेक्षा पळून जाऊन लग्न करावं, म्हणून तिला ही प्रोत्साहनपर कविता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा