४३७. वांदे
हे ही दिवस जातील म्हणताना
आयुष्यच सगळं आलंय सरत
तरीही ढकलतोय आला दिवस
उज्ज्वल भविष्याची आशा करत
वाटतं थोडं सावरल्यासारखं
पुन्हा अचानक घडतं काही
होत्याचं नव्हतं होऊन जातं
आता तर रडूही येत नाही
कसलं आलंय उज्ज्वल भविष्य
वर्तमानाचेच झालेत वांदे
केली उद्या जर आत्महत्या
मिळू देत फक्त चार खांदे
--- लबाड बोका
हे ही दिवस जातील म्हणताना
आयुष्यच सगळं आलंय सरत
तरीही ढकलतोय आला दिवस
उज्ज्वल भविष्याची आशा करत
वाटतं थोडं सावरल्यासारखं
पुन्हा अचानक घडतं काही
होत्याचं नव्हतं होऊन जातं
आता तर रडूही येत नाही
कसलं आलंय उज्ज्वल भविष्य
वर्तमानाचेच झालेत वांदे
केली उद्या जर आत्महत्या
मिळू देत फक्त चार खांदे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा