४३९. गोम
युगान् युगे मनामध्ये
घेऊन होते दर्शनाचा ध्यास
अस्पृश्यतेच्या नावाखाली
दिला गेला त्यांना त्रास
कुठे गेलं देवत्व तुझं
झाले जेव्हा परकीय हल्ले
तुलाच ठेवावं लागलं लपवून
तुझेच फक्त भोग टळले
तुझ्या त्या पुजा-यांनी
जिथे तिथे मांडलाय उच्छाद
तू आहेस म्हणतानाही
मागावी लागते कोर्टाकडे दाद
उगाचच आहे माजलेलं
तुझं एवढं स्तोम
कळली आहे पण मला
खरी काय ती गोम
इतक्या वर्षांच्या अनुभवांची
घातली आहे मी ही सांगड
देवाच्या मूर्तीच्या रुपातला
तू तर आहेस निव्वळ दगड
--- लबाड बोका
युगान् युगे मनामध्ये
घेऊन होते दर्शनाचा ध्यास
अस्पृश्यतेच्या नावाखाली
दिला गेला त्यांना त्रास
कुठे गेलं देवत्व तुझं
झाले जेव्हा परकीय हल्ले
तुलाच ठेवावं लागलं लपवून
तुझेच फक्त भोग टळले
तुझ्या त्या पुजा-यांनी
जिथे तिथे मांडलाय उच्छाद
तू आहेस म्हणतानाही
मागावी लागते कोर्टाकडे दाद
उगाचच आहे माजलेलं
तुझं एवढं स्तोम
कळली आहे पण मला
खरी काय ती गोम
इतक्या वर्षांच्या अनुभवांची
घातली आहे मी ही सांगड
देवाच्या मूर्तीच्या रुपातला
तू तर आहेस निव्वळ दगड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा