४४०. परमात्मा
हे उंच उंच डोंगर
ह्या खोल खोल द-या
खरंच सांगतो तुम्हाला
माझ्याच आहेत सा-या
हे खळाळणारे पाणी
हा भणाणणारा वारा
मीच आहे मांडला हा
माझाच सारा पसारा
हा अथांग समुद्र अन्
हे अनंत आकाश
माझेच आहे सारे हे
मीच पाडतो प्रकाश
हा दृश्य देह अन्
हा अदृश्य आत्मा
ह्या सा-यांचा करविता
मीच आहे परमात्मा
--- लबाड बोका
हे उंच उंच डोंगर
ह्या खोल खोल द-या
खरंच सांगतो तुम्हाला
माझ्याच आहेत सा-या
हे खळाळणारे पाणी
हा भणाणणारा वारा
मीच आहे मांडला हा
माझाच सारा पसारा
हा अथांग समुद्र अन्
हे अनंत आकाश
माझेच आहे सारे हे
मीच पाडतो प्रकाश
हा दृश्य देह अन्
हा अदृश्य आत्मा
ह्या सा-यांचा करविता
मीच आहे परमात्मा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा