४४२. फुकट सल्ला
केला प्रयत्न खूप मी
प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा
गटांगळ्याही खाल्ल्या खूप
तरीही किनारा गाठण्याचा
येते आहे खूप आता
माझी मलाच कीव
काही उपयोग नाही आता
जाणार वाटतं जीव
उन्मळून नुसतं येतंय आतून
दाटून येतात कढ
तुमचं काय जातंय सांगा
नुसतं म्हणायला लढ
--- लबाड बोका
केला प्रयत्न खूप मी
प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा
गटांगळ्याही खाल्ल्या खूप
तरीही किनारा गाठण्याचा
येते आहे खूप आता
माझी मलाच कीव
काही उपयोग नाही आता
जाणार वाटतं जीव
उन्मळून नुसतं येतंय आतून
दाटून येतात कढ
तुमचं काय जातंय सांगा
नुसतं म्हणायला लढ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा