४४४. कप्पाळ
तो सूर्य दिसतोय ना आकाशात
त्याला म्हणे मुलगा होता
तो होता माणसासारखा
काय बोलणार कपाळ आता
हा वहातोय ना वारा जोराचा
त्यालाही म्हणे मुलगा होता
तो होता वानरासारखा
काय बोलणार कपाळ आता
रामायणातला राम माहिताय
त्याची बायको होती सीता
भूमी म्हणे माता तिची
काय बोलणार कपाळ आता
ती वहातेय ना गंगा नदी
तिलाही म्हणे मुलगा होता
तो ही होता माणसासारखा
काय बोलणार कपाळ आता
चार तत्त्वांची चार मुलं
पाचवाच फक्त बाकी होता
मीच पडलोय आभाळातून
बोला बोला कप्पाळ आत्ता
--- लबाड बोका
तो सूर्य दिसतोय ना आकाशात
त्याला म्हणे मुलगा होता
तो होता माणसासारखा
काय बोलणार कपाळ आता
हा वहातोय ना वारा जोराचा
त्यालाही म्हणे मुलगा होता
तो होता वानरासारखा
काय बोलणार कपाळ आता
रामायणातला राम माहिताय
त्याची बायको होती सीता
भूमी म्हणे माता तिची
काय बोलणार कपाळ आता
ती वहातेय ना गंगा नदी
तिलाही म्हणे मुलगा होता
तो ही होता माणसासारखा
काय बोलणार कपाळ आता
चार तत्त्वांची चार मुलं
पाचवाच फक्त बाकी होता
मीच पडलोय आभाळातून
बोला बोला कप्पाळ आत्ता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा