४४५. वेगळी वाट
वेगळ्या वाटेने जाण्याची
मोजावी लागते किंमत
म्हणून लागते असावी
मनात तेवढी हिम्मत
सगळेच सोडतात साथ तेव्हा
वाटतं खूप एकाकी
कितीही केली गोळाबेरीज
शून्यच उरते बाकी
तेव्हाच तर लागत असते
खरी आपली कसोटी
त्यातून बाहेर पडल्यावर
यशच येतं पाठी
--- लबाड बोका
वेगळ्या वाटेने जाण्याची
मोजावी लागते किंमत
म्हणून लागते असावी
मनात तेवढी हिम्मत
सगळेच सोडतात साथ तेव्हा
वाटतं खूप एकाकी
कितीही केली गोळाबेरीज
शून्यच उरते बाकी
तेव्हाच तर लागत असते
खरी आपली कसोटी
त्यातून बाहेर पडल्यावर
यशच येतं पाठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा