४४६. उध्वस्त
आत खोल कुठेतरी
मनाच्या शांत डोहात
उठत असतात तरंग
एकामागून एक
कधी कधी
त्या तरंगांच्या
होतात लाटा
आणि मारतात धडका
मनाच्याच किना-याला
एकामागून एक
कधी मग अचानक
वाढतो जोर लाटांचा
ढासळतात किनारे
उध्वस्त
एकामागून एक
--- लबाड बोका
आत खोल कुठेतरी
मनाच्या शांत डोहात
उठत असतात तरंग
एकामागून एक
कधी कधी
त्या तरंगांच्या
होतात लाटा
आणि मारतात धडका
मनाच्याच किना-याला
एकामागून एक
कधी मग अचानक
वाढतो जोर लाटांचा
ढासळतात किनारे
उध्वस्त
एकामागून एक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा