४४७. स्वाभाविक
सगळेच असतात स्वाभाविक
कुणी लहान कुणी महान
कुणी असतात चंदन तर
कुणी असतात सहाण
चंदनाचं झिजणं तर
सहजच भरतं डोळ्यांत
सहाणही असतेच झिजत
पण येत नाही लक्षात
सहाण असते महत्त्वाची
पण नसतो तिला मान
चंदन जातं खाऊन भाव
सहाण मात्र रहाते गुमान
--- लबाड बोका
सगळेच असतात स्वाभाविक
कुणी लहान कुणी महान
कुणी असतात चंदन तर
कुणी असतात सहाण
चंदनाचं झिजणं तर
सहजच भरतं डोळ्यांत
सहाणही असतेच झिजत
पण येत नाही लक्षात
सहाण असते महत्त्वाची
पण नसतो तिला मान
चंदन जातं खाऊन भाव
सहाण मात्र रहाते गुमान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा