४५४. माझी गायकी
कधी असतो मूड चांगला
तेव्हा बसतो गायला
तुम्ही सुद्धा या कधीतरी
गाण्यात रंगून जायला
रागांचे असतात स्वर आणि
स्वरांच्या असतात श्रुती
राग गायकीच्याही असतात
काही ठराविक रीती
यमन बिलावल भूप भैरव
गातो एकेक राग
विवादी स्वर लावूनही
दिपकाने लावितो आग
कधी गातो नट कामोद
घेतो मोठी तान
तान म्हणजे गाण्याची तर
असते मोठी शान
तार सप्तकाच्या मध्यमा पर्यंत
भरतो दम गात्रांत
त्याच लयीत येतो समेवर
फक्त दोन मात्रांत
कधी गातो काफी कानडा
दोन्हींत कोमल गंधार
सगळ्या श्रुतींसहीत सजवितो
दरबारीचा दरबार
आरोह आणि अवरोहांतून
घेतो अशी फिरत
सूर तालामधल्या मात्रा
जातात काळीज चिरत
आवाज माझा पांढरी चारचा
लावतो सा वरचा
खरंच सांगतो तुम्हाला मी
गायक आहे घरचा
--- लबाड बोका
कधी असतो मूड चांगला
तेव्हा बसतो गायला
तुम्ही सुद्धा या कधीतरी
गाण्यात रंगून जायला
रागांचे असतात स्वर आणि
स्वरांच्या असतात श्रुती
राग गायकीच्याही असतात
काही ठराविक रीती
यमन बिलावल भूप भैरव
गातो एकेक राग
विवादी स्वर लावूनही
दिपकाने लावितो आग
कधी गातो नट कामोद
घेतो मोठी तान
तान म्हणजे गाण्याची तर
असते मोठी शान
तार सप्तकाच्या मध्यमा पर्यंत
भरतो दम गात्रांत
त्याच लयीत येतो समेवर
फक्त दोन मात्रांत
कधी गातो काफी कानडा
दोन्हींत कोमल गंधार
सगळ्या श्रुतींसहीत सजवितो
दरबारीचा दरबार
आरोह आणि अवरोहांतून
घेतो अशी फिरत
सूर तालामधल्या मात्रा
जातात काळीज चिरत
आवाज माझा पांढरी चारचा
लावतो सा वरचा
खरंच सांगतो तुम्हाला मी
गायक आहे घरचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा