४५५. विठ्ठल
माहित आहे मलाच पक्कं
आहेस तू तर खोटा
पण तुझ्या ह्या गदारोळात
आवाज माझा पडतोय छोटा
तुझ्या नावाचा आसरा घेऊन
पोट भरत असतात जंत
कोणी मिरवतात वारकरी म्हणून
कोणी म्हणवतात संत
तुझे भक्त म्हणवणा-यांचा
करत होते लोक छळ
छळणा-यांवर वापरलं नाहीस
कधीच तू आपलं बळ
नरक यातना भोगत होते
तरीही भजत होते तुला
काय केलंस अस्पृश्यांसाठी
दाखवलास तू त्यांना कुला
तू असताना आक्रमकांनी
स्त्रियांनाही टाकले भ्रष्टवून
तुझ्यात शक्ती नव्हती म्हणून
तुलाच ठेवावं लागलं लपवून
उत्पात आणि बडवे तर
मुतत होते गाभा-यात
आणि वर होते मिरवत
तुझ्याच समोर तो-यात
तरीही तुला मानतात खरा
जाती अठरा पगड
खरं तर तू आहेस फक्त
विठ्ठल नावाचा दगड
--- लबाड बोका
माहित आहे मलाच पक्कं
आहेस तू तर खोटा
पण तुझ्या ह्या गदारोळात
आवाज माझा पडतोय छोटा
तुझ्या नावाचा आसरा घेऊन
पोट भरत असतात जंत
कोणी मिरवतात वारकरी म्हणून
कोणी म्हणवतात संत
तुझे भक्त म्हणवणा-यांचा
करत होते लोक छळ
छळणा-यांवर वापरलं नाहीस
कधीच तू आपलं बळ
नरक यातना भोगत होते
तरीही भजत होते तुला
काय केलंस अस्पृश्यांसाठी
दाखवलास तू त्यांना कुला
तू असताना आक्रमकांनी
स्त्रियांनाही टाकले भ्रष्टवून
तुझ्यात शक्ती नव्हती म्हणून
तुलाच ठेवावं लागलं लपवून
उत्पात आणि बडवे तर
मुतत होते गाभा-यात
आणि वर होते मिरवत
तुझ्याच समोर तो-यात
तरीही तुला मानतात खरा
जाती अठरा पगड
खरं तर तू आहेस फक्त
विठ्ठल नावाचा दगड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा