४७९. नाटक - १
मनात नाही इच्छा तरी
तरीही आहे चाललो
आता वाटतं मनामधून
उगाच येतो बोललो
नाही आता ओढ तशी
दोघांच्याही मनात
भेटायचं म्हणून भेटतो
तोंडदेखलं जनात
उघडं आहे अजून तसं
दोन्हीकडून फाटक
चालूच रहातं म्हणून मग
तसंच पुढे नाटक
--- लबाड बोका
मनात नाही इच्छा तरी
तरीही आहे चाललो
आता वाटतं मनामधून
उगाच येतो बोललो
नाही आता ओढ तशी
दोघांच्याही मनात
भेटायचं म्हणून भेटतो
तोंडदेखलं जनात
उघडं आहे अजून तसं
दोन्हीकडून फाटक
चालूच रहातं म्हणून मग
तसंच पुढे नाटक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा