४६०. दवा
कशाला पडू पाया तुझ्या
उपयोगच तुझा नसेल तर
मीच करतो प्रयत्न माझे
आणि मरतो मरमर
तू नुसता बघत रहा
करू नकोस काहीच मदत
कितीही येऊ देत संकटं
मी सुद्धा नाही बधत
करून ठेवलाय कुणीतरी
उगाच तुझा गवगवा
माझ्या आजारावरती घेतो
माझी मीच शोधून दवा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा