४६१. नवा
कित्ती म्हणून केलं तुझं
सगळं सगळं गेलं वाया
माझ्यावरती पडली नाही
कधीच तुझी छत्र छाया
कशाला करू पूजा तुझी
देणार नसशील काहीच तर
भीत नाही तुला मी आता
काय करायचंय ते कर
उपयोग नाही तुझा काही
झाली आहे नुसतीच हवा
शोधतो आता माझ्यासाठी
दुसरा कोणीतरी देव नवा
--- लबाड बोका
कित्ती म्हणून केलं तुझं
सगळं सगळं गेलं वाया
माझ्यावरती पडली नाही
कधीच तुझी छत्र छाया
कशाला करू पूजा तुझी
देणार नसशील काहीच तर
भीत नाही तुला मी आता
काय करायचंय ते कर
उपयोग नाही तुझा काही
झाली आहे नुसतीच हवा
शोधतो आता माझ्यासाठी
दुसरा कोणीतरी देव नवा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा