४५९. दगड सुद्धा
कोणी कमी कोणी जास्त
सगळेच इथे आहेत खोटे
जो तो दाखवत असतो
इतरांकडेच तरीही बोटे
माझ्यावरच का मग
करता अशी चिखलफेक
तुम्हीतरी कुठे आहात
सांगता आहात तेवढे नेक
कित्येक ढोंगी आहेत जगात
मीच फक्त नाही एकमेव
शेंदूर फासून अंगभर
दगड सुद्धा झालेत देव
--- लबाड बोका
कोणी कमी कोणी जास्त
सगळेच इथे आहेत खोटे
जो तो दाखवत असतो
इतरांकडेच तरीही बोटे
माझ्यावरच का मग
करता अशी चिखलफेक
तुम्हीतरी कुठे आहात
सांगता आहात तेवढे नेक
कित्येक ढोंगी आहेत जगात
मीच फक्त नाही एकमेव
शेंदूर फासून अंगभर
दगड सुद्धा झालेत देव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा