४५८. थक्क
माहित होतं मला सुद्धा
कशी करायची जादू
काम करायचा होता आळस
बनून गेलो साधू
काहीतरी विक्षिप्त वागून
करावं लागलं फक्त ढोंग
माझीच माणसं वठवत होती
भक्तगणांचं सोंग
हळूहळू लागले नादी
लाखो लोक चक्क
माझेच चमत्कार ऐकून मी
होऊन गेलो थक्क
--- लबाड बोका
माहित होतं मला सुद्धा
कशी करायची जादू
काम करायचा होता आळस
बनून गेलो साधू
काहीतरी विक्षिप्त वागून
करावं लागलं फक्त ढोंग
माझीच माणसं वठवत होती
भक्तगणांचं सोंग
हळूहळू लागले नादी
लाखो लोक चक्क
माझेच चमत्कार ऐकून मी
होऊन गेलो थक्क
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा