४६४. उपद्व्याप
करायला जातो एक आणि
होतं नेमकं उलटं
एवढंच नाही कधी कधी तर
सोलून निघतात सालटं
जे मी करू पहातो ते
मंजूर नसतं नियतीला
तिच्या माझ्या झगड्यामध्ये
विजय नेहमीच मिळतो तिला
चालत नाही तिच्यासमोर
कोणाचीच काही टाप
एवढं कळतं तरीही करतो
नव्या जोमाने नवा उपद्व्याप
--- लबाड बोका
करायला जातो एक आणि
होतं नेमकं उलटं
एवढंच नाही कधी कधी तर
सोलून निघतात सालटं
जे मी करू पहातो ते
मंजूर नसतं नियतीला
तिच्या माझ्या झगड्यामध्ये
विजय नेहमीच मिळतो तिला
चालत नाही तिच्यासमोर
कोणाचीच काही टाप
एवढं कळतं तरीही करतो
नव्या जोमाने नवा उपद्व्याप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा