४६५. माया
पाप पुण्य सुख दु:ख
आहेत सगळे भोग
भोगल्याशिवाय येत नाही
सुटकेचाही योग
कतृर्त्वाचे पवाडे आपल्या
कुणी कुणी गातात
वाटतं तसं आपल्याला पण
नसतं आपल्या हातात
कुठून आलो कुठे जाणार
काहीच नाही माहित
देव धर्म गुरू बिरू
कोणीच खरे नाहीत
कितीही केलं गोळा तरी
जातंच शेवटी वाया
सालं हे आयुष्य म्हणजे
आहे निव्वळ माया
--- लबाड बोका
पाप पुण्य सुख दु:ख
आहेत सगळे भोग
भोगल्याशिवाय येत नाही
सुटकेचाही योग
कतृर्त्वाचे पवाडे आपल्या
कुणी कुणी गातात
वाटतं तसं आपल्याला पण
नसतं आपल्या हातात
कुठून आलो कुठे जाणार
काहीच नाही माहित
देव धर्म गुरू बिरू
कोणीच खरे नाहीत
कितीही केलं गोळा तरी
जातंच शेवटी वाया
सालं हे आयुष्य म्हणजे
आहे निव्वळ माया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा