४६३. गुरू
काही शिकवलं परिस्थितीने
कधी सुखातून कधी दु:खातून
कधी स्वत:च्या कधी कुणाच्या
काही शिकलो अनुभवातून
सगे सोयरे पुस्तकं सुद्धा
ठेवतात मला जगात टिकवून
कधी मित्र तर कधी शत्रू
ते ही गेले काही शिकवून
आई बाबा आणि शिक्षक
त्यांच्यामुळे मी शिकलो शाळा
ध्यानात घेत नाही पण कोणी
कसा विसरू त्या नशिबाला
पशू पक्षी झाडं निसर्ग
वाटतं मला अजबच कोडं
ह्या सा-यांकडूनही शिकतो मी
रोज काही थोडं थोडं
ग्रह तारे आकाशगंगा
फिरणं त्यांचं आहेच सुरू
कुणी एक नाही माझा
सगळेच आहेत माझे गुरू
--- लबाड बोका
काही शिकवलं परिस्थितीने
कधी सुखातून कधी दु:खातून
कधी स्वत:च्या कधी कुणाच्या
काही शिकलो अनुभवातून
सगे सोयरे पुस्तकं सुद्धा
ठेवतात मला जगात टिकवून
कधी मित्र तर कधी शत्रू
ते ही गेले काही शिकवून
आई बाबा आणि शिक्षक
त्यांच्यामुळे मी शिकलो शाळा
ध्यानात घेत नाही पण कोणी
कसा विसरू त्या नशिबाला
पशू पक्षी झाडं निसर्ग
वाटतं मला अजबच कोडं
ह्या सा-यांकडूनही शिकतो मी
रोज काही थोडं थोडं
ग्रह तारे आकाशगंगा
फिरणं त्यांचं आहेच सुरू
कुणी एक नाही माझा
सगळेच आहेत माझे गुरू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा