४७६. उध्वस्त
सकाळपासून पक्षी पक्षीण
फिरकलेच नाहीत कुणी
जाणवू लागली मलाच मग
शांतता जीवघेणी
गेले काही दिवस तर
होत होता त्यांचा त्रास
आता दिसत नव्हते पण
कुणी सुद्धा जवळपास
शंका आली मनात म्हणून
डोकावून मी पाहिलं त्यात
धक्काच बसला पाहून मला
अंडीच नव्हती घरट्यात
कालपर्यंत गजबजलेलं
वाटत होतं कसं मस्त
अजून आहे शाबूत घरटं
तरीही वाटतं उध्वस्त
--- लबाड बोका
सकाळपासून पक्षी पक्षीण
फिरकलेच नाहीत कुणी
जाणवू लागली मलाच मग
शांतता जीवघेणी
गेले काही दिवस तर
होत होता त्यांचा त्रास
आता दिसत नव्हते पण
कुणी सुद्धा जवळपास
शंका आली मनात म्हणून
डोकावून मी पाहिलं त्यात
धक्काच बसला पाहून मला
अंडीच नव्हती घरट्यात
कालपर्यंत गजबजलेलं
वाटत होतं कसं मस्त
अजून आहे शाबूत घरटं
तरीही वाटतं उध्वस्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा