४७५. म्हणे
करा जरा गंभीरपणे
विचार आपल्या आयुष्याचा
चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांनंतर म्हणे
जन्म मिळतो मनुष्याचा
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायची
काहीतरी शोधा युक्ती
आत्मा राहिला अतृप्त तर
मिळत नाही म्हणे मुक्ती
म्हणू नका असं कधीच
काहीच नाही पडत फरक
पाप पुण्ण्याच्याच हिशोबाने
मिळतो म्हणे स्वर्ग नरक
काय खरं नी काय खोटं
आत्म्यालाच त्या माहित
आत्मा आणि परमात्मा
वेगवेगळे म्हणे नाहीत
--- लबाड बोका
करा जरा गंभीरपणे
विचार आपल्या आयुष्याचा
चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांनंतर म्हणे
जन्म मिळतो मनुष्याचा
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायची
काहीतरी शोधा युक्ती
आत्मा राहिला अतृप्त तर
मिळत नाही म्हणे मुक्ती
म्हणू नका असं कधीच
काहीच नाही पडत फरक
पाप पुण्ण्याच्याच हिशोबाने
मिळतो म्हणे स्वर्ग नरक
काय खरं नी काय खोटं
आत्म्यालाच त्या माहित
आत्मा आणि परमात्मा
वेगवेगळे म्हणे नाहीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा