४६९. दोर
एरवी वाटलं असतं बरं
रात्रीचं हे निरभ्र आभाळ
नाचलो ही असतो कदाचित
पायामध्ये बांधून चाळ
मला तरी आहे तसा
चांदण्यांचा ह्या भारी छंद
पूर्ण चंद्र बघून सुद्धा
होत नाही पण आता आनंद
बघता बघता संपत आलाय
दुसरा सुद्धा आता माह
ह्या शितल चांदण्याचाही
व्हायला लागलाय आता दाह
मृग गेलं आर्द्रा गेलं
कोरडाच गेला आणि आषाढ
पेरून ठेवलंय बी पण
कधी उगवणार आहे दाढ
सुकली नव्हती कधीच एवढी
गावामधली कोंड
माणसं तर माणसं तशी
जमिनीनेही वासलंय तोंड
काय करू गुरांचं ह्या
बाहेर पडलीत त्यांची हाडं
पोरासारखी वाढवलेली
सुकून गेलीत सगळी झाडं
उपाशी भुकेली पोरं बिचारी
तोंड त्यांचं झालंय बारकं
नजर त्यांची चुकवतो तरी
काहीतरी मागतात सारखं
बघवत नाहीत हाल त्यांचे
आतड्यांनाच पडतो पिळ
त्यांच्यासाठीच तुटतंय हो
काळीज असं तीळ तीळ
काय होणार आहे पुढे
लागला आहे जीवाला घोर
दिसू लागला आहे आता
डोळ्यांसमोर तोच दोर
--- लबाड बोका
एरवी वाटलं असतं बरं
रात्रीचं हे निरभ्र आभाळ
नाचलो ही असतो कदाचित
पायामध्ये बांधून चाळ
मला तरी आहे तसा
चांदण्यांचा ह्या भारी छंद
पूर्ण चंद्र बघून सुद्धा
होत नाही पण आता आनंद
बघता बघता संपत आलाय
दुसरा सुद्धा आता माह
ह्या शितल चांदण्याचाही
व्हायला लागलाय आता दाह
मृग गेलं आर्द्रा गेलं
कोरडाच गेला आणि आषाढ
पेरून ठेवलंय बी पण
कधी उगवणार आहे दाढ
सुकली नव्हती कधीच एवढी
गावामधली कोंड
माणसं तर माणसं तशी
जमिनीनेही वासलंय तोंड
काय करू गुरांचं ह्या
बाहेर पडलीत त्यांची हाडं
पोरासारखी वाढवलेली
सुकून गेलीत सगळी झाडं
उपाशी भुकेली पोरं बिचारी
तोंड त्यांचं झालंय बारकं
नजर त्यांची चुकवतो तरी
काहीतरी मागतात सारखं
बघवत नाहीत हाल त्यांचे
आतड्यांनाच पडतो पिळ
त्यांच्यासाठीच तुटतंय हो
काळीज असं तीळ तीळ
काय होणार आहे पुढे
लागला आहे जीवाला घोर
दिसू लागला आहे आता
डोळ्यांसमोर तोच दोर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा