४७०. जुगार
मरण नाही आलं म्हणून
आतापर्यंत जगलो
कधी कधी मरतानाही
नशिबामुळेच तगलो
कधी वाटतं खरंच मरावसं
इतका होतो निराश
जगावंसंही वाटतं परत
सहन करतो म्हणून त्रास
कधी वाटतं स्वत:हूनच
घ्यावी सपशेल माघार
पुन्हा सुखाच्या आशेवरती
आयुष्याचा खेळतो जुगार
--- लबाड बोका
मरण नाही आलं म्हणून
आतापर्यंत जगलो
कधी कधी मरतानाही
नशिबामुळेच तगलो
कधी वाटतं खरंच मरावसं
इतका होतो निराश
जगावंसंही वाटतं परत
सहन करतो म्हणून त्रास
कधी वाटतं स्वत:हूनच
घ्यावी सपशेल माघार
पुन्हा सुखाच्या आशेवरती
आयुष्याचा खेळतो जुगार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा