४७२. फरक
देवाची केली तर ती भक्ती
इतरांची केली तर हाजी
भक्त ठरतो श्रेष्ठ आणि
बाकीचे ठरतात पाजी
देवाची ओवाळली तर आरती
दुसऱ्यांची ओवाळली तर लाचारी
संस्कार असतात तसेच म्हणून
तशीच वागतात लोकं बिचारी
देवाचा लोभ धरतो तो साधक
इतर लोभ धरतो तो विकारी
देवाकडे मागतो तो भक्त
इतरांकडे मागतो तो भिकारी
--- लबाड बोका
देवाची केली तर ती भक्ती
इतरांची केली तर हाजी
भक्त ठरतो श्रेष्ठ आणि
बाकीचे ठरतात पाजी
देवाची ओवाळली तर आरती
दुसऱ्यांची ओवाळली तर लाचारी
संस्कार असतात तसेच म्हणून
तशीच वागतात लोकं बिचारी
देवाचा लोभ धरतो तो साधक
इतर लोभ धरतो तो विकारी
देवाकडे मागतो तो भक्त
इतरांकडे मागतो तो भिकारी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा