४७१. खोटं
एक घेतात दगड आणि
देतात त्याला आकार
त्यालाच म्हणतात देव आणि
काहीबाही करतात प्रकार
आहे म्हणतात जागृत तो
पावतो म्हणतात नवसाला
रांग मग वाढतच जाते
अशीच दिवसा दिवसाला
त्याचीच पूजा करतात लोक
त्यालाच आणि वहातात फुलं
कधी कधी त्याच्याचमुळे
होतातही म्हणतात मुलं
बरेचजण असतात असे
त्याच्याच जीवावर भरतात पोटं
कोणीच नाही म्हणत मग
हे सगळं आहे खोटं
--- लबाड बोका
एक घेतात दगड आणि
देतात त्याला आकार
त्यालाच म्हणतात देव आणि
काहीबाही करतात प्रकार
आहे म्हणतात जागृत तो
पावतो म्हणतात नवसाला
रांग मग वाढतच जाते
अशीच दिवसा दिवसाला
त्याचीच पूजा करतात लोक
त्यालाच आणि वहातात फुलं
कधी कधी त्याच्याचमुळे
होतातही म्हणतात मुलं
बरेचजण असतात असे
त्याच्याच जीवावर भरतात पोटं
कोणीच नाही म्हणत मग
हे सगळं आहे खोटं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा