४५७. खोटेपणा 2
आमची सावली पडली तरी
व्हायचा तुम्हाला विटाळ
खोटी नाटी कारणं सांगून
आणायचात आमच्यावर किटाळ
कुत्री मांजरं गुरं गाढवं
पाळायचात तुम्ही घरात
माणसासारखी माणसं आम्ही
भिक मागायचो दारात
आमच्या नुसत्या दर्शनाने
व्हायचे तुम्हाला अपशकुन
आणि साधा जीव जगवताना
जायचो आम्ही थकून
कसला सांगताय मोठेपणा
देवाचा आणि धर्माचा
साधी माणुसकी नव्हती तुम्हाला
आणि सांगताय योग कर्माचा
--- लबाड बोका
आमची सावली पडली तरी
व्हायचा तुम्हाला विटाळ
खोटी नाटी कारणं सांगून
आणायचात आमच्यावर किटाळ
कुत्री मांजरं गुरं गाढवं
पाळायचात तुम्ही घरात
माणसासारखी माणसं आम्ही
भिक मागायचो दारात
आमच्या नुसत्या दर्शनाने
व्हायचे तुम्हाला अपशकुन
आणि साधा जीव जगवताना
जायचो आम्ही थकून
कसला सांगताय मोठेपणा
देवाचा आणि धर्माचा
साधी माणुसकी नव्हती तुम्हाला
आणि सांगताय योग कर्माचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा