४८१. सेवाव्रती
बरेच आहेत कमनशिबी असे
भरपूर आहेत त्यांचे प्रकार
भोगतात भोग आपले आपले
करत नाहीत कधी तक्रार
पहावत नाहीत आपल्यालाच
त्यांचे असे हालहाल
तरीसुद्धा आपल्याकडून
होत नाही काहीच हालचाल
आपण करतो विचार फक्त
कसे आणि कुठे पुरे पडणार
त्यांच्याकडे बघून आपण फक्त
सुकं सुकंच रडणार
तरीही असतात काही माणसं
जगतात जिणं वेगळं
फाटलेल्या आभाळालाही
लावत बसतात ठिगळं
दुसऱ्यांपायी हौस मौज
टाकतात आपली मारून
जिंकतातही शेवटी आणि
कित्येक लढाया हरून
नशिबात नसलेले भोगही
बुद्ध्याच घेतात ओढवून
मरणाच्या दाढेत असलेल्यांनाही
आणतात बळेच सोडवून
सलाम त्यांच्या सेवाव्रताला
सलाम त्यांच्या तादात्म्याला
कर्तृत्वालाही सलाम त्यांच्या
सलाम त्यांच्या आत्म्याला
--- लबाड बोका
बरेच आहेत कमनशिबी असे
भरपूर आहेत त्यांचे प्रकार
भोगतात भोग आपले आपले
करत नाहीत कधी तक्रार
पहावत नाहीत आपल्यालाच
त्यांचे असे हालहाल
तरीसुद्धा आपल्याकडून
होत नाही काहीच हालचाल
आपण करतो विचार फक्त
कसे आणि कुठे पुरे पडणार
त्यांच्याकडे बघून आपण फक्त
सुकं सुकंच रडणार
तरीही असतात काही माणसं
जगतात जिणं वेगळं
फाटलेल्या आभाळालाही
लावत बसतात ठिगळं
दुसऱ्यांपायी हौस मौज
टाकतात आपली मारून
जिंकतातही शेवटी आणि
कित्येक लढाया हरून
नशिबात नसलेले भोगही
बुद्ध्याच घेतात ओढवून
मरणाच्या दाढेत असलेल्यांनाही
आणतात बळेच सोडवून
सलाम त्यांच्या सेवाव्रताला
सलाम त्यांच्या तादात्म्याला
कर्तृत्वालाही सलाम त्यांच्या
सलाम त्यांच्या आत्म्याला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा