४८२. मूर्ख मी
सत्याने वागतो नेहमी तरी
मीच असतो मूर्ख ठरत
सगळे असतात जिंकत आणि
मी मात्र असतो हरत
सरळ मार्गाने जाणं माझं
कोणीच नाही ग्राह्य धरत
कुठेही जरी गेलो तरी
तोच अनुभव येतो परत
सगळे देतात आश्वासनं फक्त
कारवाई कोणीच नाही करत दाद तरी कोणाकडे मागू
जो तो असतो स्वत:च चरत
शंभर अपराध होऊन गेले
घडा त्यांचा नाही भरत
मी मात्र जगत असतो
रोज थोडं थोडं मरत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा