४८७. लोणी
तंग आहे वातावरण
कधीही उडेल भडका
आहे फक्त अवकाश
द्यायचा कुणीतरी तडका
कापरासारखी जाईल
जळून एक एक जिंदगी
आहे फक्त खोटी
टाकायची कुणीतरी ठिणगी
खुश असतील मनापासून
पार्ट्या आता दोन्ही
मढ्यांच्याच टाळूंवरचं
खायचंय त्यांना लोणी
--- लबाड बोका
तंग आहे वातावरण
कधीही उडेल भडका
आहे फक्त अवकाश
द्यायचा कुणीतरी तडका
कापरासारखी जाईल
जळून एक एक जिंदगी
आहे फक्त खोटी
टाकायची कुणीतरी ठिणगी
खुश असतील मनापासून
पार्ट्या आता दोन्ही
मढ्यांच्याच टाळूंवरचं
खायचंय त्यांना लोणी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा