४८९. दुभंग
वावरत असतात पुरूष इथले
लावून मुखवटा रामाचा
माहित असतं त्यांना पण
कृष्णच असतो कामाचा
स्त्रियांनाही वाटत असतं
पती असावा राम
आवडत असतो त्यांनाही पण
तोच कृष्ण घनश्याम
भारताच्या ह्या संस्कृतीची
आहेत ही दोन तत्त्वं
प्रत्येक भारतीय आहे इथला
एक दुभंग व्यक्तिमत्त्व
--- लबाड बोका
वावरत असतात पुरूष इथले
लावून मुखवटा रामाचा
माहित असतं त्यांना पण
कृष्णच असतो कामाचा
स्त्रियांनाही वाटत असतं
पती असावा राम
आवडत असतो त्यांनाही पण
तोच कृष्ण घनश्याम
भारताच्या ह्या संस्कृतीची
आहेत ही दोन तत्त्वं
प्रत्येक भारतीय आहे इथला
एक दुभंग व्यक्तिमत्त्व
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा