४९२. शहाणे
कोण आहे शहाणा इथे
कोण नाही वेडा
ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये
ज्याचा त्याचा किडा
जो तो असतो घेऊन फक्त
विचार आपले पक्के
वागत असतात वेगळे वेगळे
भाऊ सुद्धा सख्खे
ज्याचे त्याचे असतातही
आपले आपले बहाणे
ज्याला त्याला वाटत असतं
आपणच फक्त शहाणे
--- लबाड बोका
कोण आहे शहाणा इथे
कोण नाही वेडा
ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये
ज्याचा त्याचा किडा
जो तो असतो घेऊन फक्त
विचार आपले पक्के
वागत असतात वेगळे वेगळे
भाऊ सुद्धा सख्खे
ज्याचे त्याचे असतातही
आपले आपले बहाणे
ज्याला त्याला वाटत असतं
आपणच फक्त शहाणे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा