४९३. सवय
उडाला आहे कधीचाच
तुझ्यावरचा विश्वास
तुझ्या रूपाच्या प्रेमात पण
पडलो आहे खास
वाटत नाही करावीशी
तुझी आता स्तुती
भारल्यागत पहात रहातो
तरीही तुझी मूर्ती
थोरामोठ्यांनी सांगितलेलं
सत्य गेलंय वाया
मनापासून नाही तरी
पडतो तुझ्या पाया
--- लबाड बोका
उडाला आहे कधीचाच
तुझ्यावरचा विश्वास
तुझ्या रूपाच्या प्रेमात पण
पडलो आहे खास
वाटत नाही करावीशी
तुझी आता स्तुती
भारल्यागत पहात रहातो
तरीही तुझी मूर्ती
थोरामोठ्यांनी सांगितलेलं
सत्य गेलंय वाया
मनापासून नाही तरी
पडतो तुझ्या पाया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा