४९४. विसंवाद
तुला विसरण्यासाठी मी
करत असतो प्रयत्न फार
तरी पुन्हा अचानकच
तुझाच येतो मनात विचार
तुझ्या विचारात असलो की
रहात नाही काहीच भान
दुख्ख ह्याचंच वाटतं की
तुला काहीच नसते जाण
मी मात्र रहातो कुढत
वाटत असते मनात आशा
कुठेतरी कमी पडलीय
संवाद साधण्यासाठी भाषा
--- लबाड बोका
तुला विसरण्यासाठी मी
करत असतो प्रयत्न फार
तरी पुन्हा अचानकच
तुझाच येतो मनात विचार
तुझ्या विचारात असलो की
रहात नाही काहीच भान
दुख्ख ह्याचंच वाटतं की
तुला काहीच नसते जाण
मी मात्र रहातो कुढत
वाटत असते मनात आशा
कुठेतरी कमी पडलीय
संवाद साधण्यासाठी भाषा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा