४८५. अभागी
नका रे घेऊ वाटून अशी
माझ्याबद्दल असूया
तुम्ही करता विचार मनात
मला इथे खुपतात सूया
कळतंय मला सारं काही
तुमच्या वागण्यावरून
पण आत्ता कुठे जिंकतोय मी
पुन्हा पुन्हा हरून
दुख्खं माझी ठेवतो मनात
वागतो आणि आनंदी
तुम्हाला मात्र वाटतं उगाच
किती हा प्राणी स्वच्छंदी
शक्य असतं तर ठेवलं असतं
तुम्हाला माझ्या जागी
कळलं असतं तुम्हाला मग
किती आहे मी अभागी
--- लबाड बोका
नका रे घेऊ वाटून अशी
माझ्याबद्दल असूया
तुम्ही करता विचार मनात
मला इथे खुपतात सूया
कळतंय मला सारं काही
तुमच्या वागण्यावरून
पण आत्ता कुठे जिंकतोय मी
पुन्हा पुन्हा हरून
दुख्खं माझी ठेवतो मनात
वागतो आणि आनंदी
तुम्हाला मात्र वाटतं उगाच
किती हा प्राणी स्वच्छंदी
शक्य असतं तर ठेवलं असतं
तुम्हाला माझ्या जागी
कळलं असतं तुम्हाला मग
किती आहे मी अभागी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा