४९७. अडाणी
नाही वाटत वाचावेसे
वेद गीता पुराण
ग्रंथसाहिब त्रिपिटक
बायबल तोराह कुराण
नाही व्हायचंय वाचून मला
इतरांसारखं कर्मठ
माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून
नाही व्हायचंय उर्मट
नाही ऐकायचंय काही मला
कोणाच्याच मनचं वाढीव
त्या ईश्वरानेच निर्मिलेले
नाही घ्यायचेत जीव
धर्मग्रंथ वाचून माणसं
झालीच नाहीत शहाणी
जाणून बुजून म्हणून मी
राहिलोय अजून अडाणी
--- लबाड बोका
नाही वाटत वाचावेसे
वेद गीता पुराण
ग्रंथसाहिब त्रिपिटक
बायबल तोराह कुराण
नाही व्हायचंय वाचून मला
इतरांसारखं कर्मठ
माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून
नाही व्हायचंय उर्मट
नाही ऐकायचंय काही मला
कोणाच्याच मनचं वाढीव
त्या ईश्वरानेच निर्मिलेले
नाही घ्यायचेत जीव
धर्मग्रंथ वाचून माणसं
झालीच नाहीत शहाणी
जाणून बुजून म्हणून मी
राहिलोय अजून अडाणी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा