४९६. श्राद्ध
मनात जरी नसलं तरी
ऐकावं लागतं इतरांचं
शास्त्रामध्ये सांगितलंय म्हणून
श्राद्ध घालतो पितरांचं
नाही केलं तसं तर
त्यांना म्हणे येतो राग
भीती वाटते मनामध्ये
आयुष्यालाच लावतील आग
खिशात नसतात पैसे म्हणून
उधार-उसण करतो थोडं
घालतो आणि गावजेवण
थोडं तिखट थोडं गोडं
दिसत नाहीत आशीर्वाद कुठे
पितर तर गेलेत मरून
मी ही मरेन एखाद दिवशी
पोरांवरती कर्ज करून
--- लबाड बोका
मनात जरी नसलं तरी
ऐकावं लागतं इतरांचं
शास्त्रामध्ये सांगितलंय म्हणून
श्राद्ध घालतो पितरांचं
नाही केलं तसं तर
त्यांना म्हणे येतो राग
भीती वाटते मनामध्ये
आयुष्यालाच लावतील आग
खिशात नसतात पैसे म्हणून
उधार-उसण करतो थोडं
घालतो आणि गावजेवण
थोडं तिखट थोडं गोडं
दिसत नाहीत आशीर्वाद कुठे
पितर तर गेलेत मरून
मी ही मरेन एखाद दिवशी
पोरांवरती कर्ज करून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा