५००. धन्यवाद
लिहितो बापडा काहीतरी
पण तुम्ही देता दाद
तुमच्यामुळेच जपतो मी
कवितेचा हा नाद
तुम्हीच देता प्रोत्साहन अन्
तुम्हीच देता ऊर्जा
तुमच्यामुळेच वाढतो माझ्या
कवितेचाही दर्जा
करतो जरी कविता मी
तुम्हीच खरे मायबाप
तुम्हीच देता पाठीवरती
शाबासकीची थाप
असं भाग्य मिळत नाही
मागूनही याचकांना
देतो धन्यवाद मनापासून
तुम्हा सर्व वाचकांना
--- लबाड बोका
लिहितो बापडा काहीतरी
पण तुम्ही देता दाद
तुमच्यामुळेच जपतो मी
कवितेचा हा नाद
तुम्हीच देता प्रोत्साहन अन्
तुम्हीच देता ऊर्जा
तुमच्यामुळेच वाढतो माझ्या
कवितेचाही दर्जा
करतो जरी कविता मी
तुम्हीच खरे मायबाप
तुम्हीच देता पाठीवरती
शाबासकीची थाप
असं भाग्य मिळत नाही
मागूनही याचकांना
देतो धन्यवाद मनापासून
तुम्हा सर्व वाचकांना
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा