५०१. सौंदर्य
काळ्या कुळकुळीत पाषाणाची
असते जशी सुंदर मूर्ती
तशीच वाटते ती मला
असून काळी पुरती
चेहरा तर आहे तिचा
अगदी आखीव रेखीव
जणू काही निर्मात्याने
केलंय काम कोरीव
पहात रहातो तिच्याकडे मी
हरपून जाऊन भान
माझ्या सगळ्या जाणीवांना
आलीय नवी जाण
आतापर्यंतच्या गैरसमजांची
गळून पडलीय कात
सौंदर्य फक्त नसतं रंगात
असतं ते तर रूपात
--- लबाड बोका
काळ्या कुळकुळीत पाषाणाची
असते जशी सुंदर मूर्ती
तशीच वाटते ती मला
असून काळी पुरती
चेहरा तर आहे तिचा
अगदी आखीव रेखीव
जणू काही निर्मात्याने
केलंय काम कोरीव
पहात रहातो तिच्याकडे मी
हरपून जाऊन भान
माझ्या सगळ्या जाणीवांना
आलीय नवी जाण
आतापर्यंतच्या गैरसमजांची
गळून पडलीय कात
सौंदर्य फक्त नसतं रंगात
असतं ते तर रूपात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा