५०५. लक्ष्य
लाव प्रत्यंचा धनुष्याला
चढव आणि बाण
काय करायचंय तुला ते
ते नेमकं जाण
ठेव लावून नजर आणि
त्याच पक्ष्यावरती
सोड नेमका बाण आता
बरोब्बर लक्ष्यावरती
हीच आहे संधी आता
घे नेमकी साधून
उष्टी खरकटी काढ नाहीतर
वाढून आणि रांधून
--- लबाड बोका
लाव प्रत्यंचा धनुष्याला
चढव आणि बाण
काय करायचंय तुला ते
ते नेमकं जाण
ठेव लावून नजर आणि
त्याच पक्ष्यावरती
सोड नेमका बाण आता
बरोब्बर लक्ष्यावरती
हीच आहे संधी आता
घे नेमकी साधून
उष्टी खरकटी काढ नाहीतर
वाढून आणि रांधून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा