५०६. खरं नाणं
सत्य असेल साथीला तर
येते मनात हिम्मत
सत्याशिवाय कोणाचीही
घसरून जाते किम्मत
सत्याने जगायचं म्हटलं तर
अवघड असतं जगणं
सत्यासाठी लढणं म्हणजे
मरणासोबत लग्न
तरीही जगलात सत्याने तर
आयुष्य होतं गाणं
खरं जेव्हा असतं तेव्हाच
खणखणीत वाजतं नाणं
--- लबाड बोका
सत्य असेल साथीला तर
येते मनात हिम्मत
सत्याशिवाय कोणाचीही
घसरून जाते किम्मत
सत्याने जगायचं म्हटलं तर
अवघड असतं जगणं
सत्यासाठी लढणं म्हणजे
मरणासोबत लग्न
तरीही जगलात सत्याने तर
आयुष्य होतं गाणं
खरं जेव्हा असतं तेव्हाच
खणखणीत वाजतं नाणं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा