५०८. सोयीस्कर
काही काही गोष्टींबाबत
पाळतात माणसं मौन
आणि वर मानभावीपणे
म्हणतात त्यांना गौण
असतातच त्या गोष्टी तशा
अडचणीच्या वाटणा-या
नको तेव्हा नको तिथे
खिंडीमध्ये गाठणा-या
करतात दुर्लक्ष त्यांच्याकडे
पाडू पहातात विसर
सत्य पहातात दडपू आणि
वागतात वर सोयीस्कर
--- लबाड बोका
काही काही गोष्टींबाबत
पाळतात माणसं मौन
आणि वर मानभावीपणे
म्हणतात त्यांना गौण
असतातच त्या गोष्टी तशा
अडचणीच्या वाटणा-या
नको तेव्हा नको तिथे
खिंडीमध्ये गाठणा-या
करतात दुर्लक्ष त्यांच्याकडे
पाडू पहातात विसर
सत्य पहातात दडपू आणि
वागतात वर सोयीस्कर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा