५०९. अविचार
असाच एखादा वाईट विचार
कुठून तरी येतो मनात
द्विधा मनस्थिती होऊनही
विवेकावर करतो मात
व्हायचं तेच होतं शेवटी
लागायची ती लागते वाट
भानावरती येईपर्यंत
वाढून ठेवलेलं असतं ताट
मीच माझ्या पायावरती
पाडून घेत असतो धोंड
अविचाराने वागतो आणि
करून घेतो काळं तोंड
--- लबाड बोका
असाच एखादा वाईट विचार
कुठून तरी येतो मनात
द्विधा मनस्थिती होऊनही
विवेकावर करतो मात
व्हायचं तेच होतं शेवटी
लागायची ती लागते वाट
भानावरती येईपर्यंत
वाढून ठेवलेलं असतं ताट
मीच माझ्या पायावरती
पाडून घेत असतो धोंड
अविचाराने वागतो आणि
करून घेतो काळं तोंड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा