५१६. विज्ञान सूर्य
अज्ञानाने व्यापलं होतं
सारं सारं आकाश
ज्ञानाचे दिवे लावूनही
पडत नव्हता प्रकाश
गिळला होता सूर्य राहूने
झाकले होते कोंबडे
देवाधर्माच्या नावावर
माजले होते चोंबडे
विज्ञानाचा सूर्य जेव्हा
उगवला क्षितिजापार
दूर झाला तेव्हापासून
युगायुगांचा अंधार
--- लबाड बोका
अज्ञानाने व्यापलं होतं
सारं सारं आकाश
ज्ञानाचे दिवे लावूनही
पडत नव्हता प्रकाश
गिळला होता सूर्य राहूने
झाकले होते कोंबडे
देवाधर्माच्या नावावर
माजले होते चोंबडे
विज्ञानाचा सूर्य जेव्हा
उगवला क्षितिजापार
दूर झाला तेव्हापासून
युगायुगांचा अंधार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा