५१७. अर्धवट कविता
आहेत तशा बऱ्याच अजून
कविता अर्धवट पडून
एखाद दुसऱ्या शब्दासाठी
राहिलंय गाडं अडून
असतो आणि चांगला
त्या कवितांचा विषय
नेमक्या शब्दाअभावी पण
राहुन जातो आशय
कितीही केला विचार तरी
सापडत नाहीत शब्द
कविता राहून जाते तशीच
मूक आणि स्तब्ध
--- लबाड बोका
आहेत तशा बऱ्याच अजून
कविता अर्धवट पडून
एखाद दुसऱ्या शब्दासाठी
राहिलंय गाडं अडून
असतो आणि चांगला
त्या कवितांचा विषय
नेमक्या शब्दाअभावी पण
राहुन जातो आशय
कितीही केला विचार तरी
सापडत नाहीत शब्द
कविता राहून जाते तशीच
मूक आणि स्तब्ध
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा