५१८. भ्रम
पृथ्वीच फिरते गरागरा
सूर्याभोवती कधीपासून
सूर्यच फिरतोय पृथ्वीभोवती
असंच राहिलंय पण भासून
अगदी तसंच भासतंय मला
सगळं काही करतोय मीच
तसं काही नसतं पण
खरी गोष्ट आहे हीच
भास आणि वास्तवामध्ये
फरक तसा असतो खूप
तरी सुद्धा रहातं लपून
प्रत्येकाचंच खरं रूप
--- लबाड बोका
पृथ्वीच फिरते गरागरा
सूर्याभोवती कधीपासून
सूर्यच फिरतोय पृथ्वीभोवती
असंच राहिलंय पण भासून
अगदी तसंच भासतंय मला
सगळं काही करतोय मीच
तसं काही नसतं पण
खरी गोष्ट आहे हीच
भास आणि वास्तवामध्ये
फरक तसा असतो खूप
तरी सुद्धा रहातं लपून
प्रत्येकाचंच खरं रूप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा