५११. बिघाड
वर्षानुवर्षे दळताहेत
तेच तेच दळप
भिन्न भिन्न धर्मीयांचे
भिन्न भिन्न कळप
आलाय खूप कंटाळा
आता ह्या साऱ्यांचा
आणि त्यांच्या त्याच त्याच
निरूपयोगी नाऱ्यांचा
करा रे आता काहीतरी
ह्याच्याहून निराळे
तुमचे अजून चालले आहेत
तेच येडे चाळे
पॅक पॅक करत बसायला
नाही काही तुम्ही बदकं
पडा त्यातून बाहेर
घाण झालंय डबकं
जग चाललंय कुठे
पहा डोळे उघडून
घेऊ नका आता
उगाच डोकं बिघडून
--- लबाड बोका
वर्षानुवर्षे दळताहेत
तेच तेच दळप
भिन्न भिन्न धर्मीयांचे
भिन्न भिन्न कळप
आलाय खूप कंटाळा
आता ह्या साऱ्यांचा
आणि त्यांच्या त्याच त्याच
निरूपयोगी नाऱ्यांचा
करा रे आता काहीतरी
ह्याच्याहून निराळे
तुमचे अजून चालले आहेत
तेच येडे चाळे
पॅक पॅक करत बसायला
नाही काही तुम्ही बदकं
पडा त्यातून बाहेर
घाण झालंय डबकं
जग चाललंय कुठे
पहा डोळे उघडून
घेऊ नका आता
उगाच डोकं बिघडून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा