५१०. पश्चात बुद्धी
मलाच झाला उशीर खरंतर
प्रत्येक संधी हुकली
आयुष्याची गणितं साली
सगळीच कशी चुकली
केला प्रयत्न पुन्हा तरी पण
जमलाच नाही मेळ
काही नाही उपाय आता
सुटलाय हातून खेळ
बसलोय आता हात चोळत
बघतोय मागे वळून
सगळ्या चुका आल्या ध्यानात
पण गेलीय वेळ टळून
--- लबाड बोका
मलाच झाला उशीर खरंतर
प्रत्येक संधी हुकली
आयुष्याची गणितं साली
सगळीच कशी चुकली
केला प्रयत्न पुन्हा तरी पण
जमलाच नाही मेळ
काही नाही उपाय आता
सुटलाय हातून खेळ
बसलोय आता हात चोळत
बघतोय मागे वळून
सगळ्या चुका आल्या ध्यानात
पण गेलीय वेळ टळून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा