५२५. माया
चिंता नाही कसली आता
जगतो आहे आरामात
वेळ सुद्धा जातो मजेत
सारखा हरीनामात
लहान थोर सगळे कसे
येतात दर्शनाला
चांगला अनुभव येतो म्हणे
माझा कुणाकुणाला
नको नको म्हणतो तरी
पडतात लोक पाया
थोडी थोडी म्हणता म्हणता
खूप जमवली माया
--- लबाड बोका
चिंता नाही कसली आता
जगतो आहे आरामात
वेळ सुद्धा जातो मजेत
सारखा हरीनामात
लहान थोर सगळे कसे
येतात दर्शनाला
चांगला अनुभव येतो म्हणे
माझा कुणाकुणाला
नको नको म्हणतो तरी
पडतात लोक पाया
थोडी थोडी म्हणता म्हणता
खूप जमवली माया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा