५२६. झाडं
माझ्यासमोरच वाढली ती
झाली एवढी मोठी
मीच घातली होती त्यांना
खत पाणी माती
मीच लावली होती बीजं
फुटले होते अंकुर
आनंदाने आला होता
भरून माझा उर
आवड होती मला सुद्धा
म्हणून एवढी लावली
आज देतात फळं मला
देतात आणि सावली
--- लबाड बोका
माझ्यासमोरच वाढली ती
झाली एवढी मोठी
मीच घातली होती त्यांना
खत पाणी माती
मीच लावली होती बीजं
फुटले होते अंकुर
आनंदाने आला होता
भरून माझा उर
आवड होती मला सुद्धा
म्हणून एवढी लावली
आज देतात फळं मला
देतात आणि सावली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा